मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जुलै 2018 (15:24 IST)

इरफानने सुजीत सरकारचा चित्रपट साईन केला

अभिनेता इरफान खान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने सुजीत सरकारचा एक चित्रपट साईन केला आहे. इरफानच्या या नवीन चित्रपटाचं शुटींग केव्हा सुरू होणार याबद्दल मात्र अद्याप काही सांगण्यात आलेलं नाही. इरफानच्या तब्येतीला झेपेल अशा पद्धतीनेच नवीन चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज इरफानच्या तब्येतीची माहिती देत असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.” आम्ही रोज एकमेकांना व्हॉट्सअॅपवरुन मेसेज करत असतो. तो त्याचा वेळ क्रिकेट बघण्यात घालवतो, तर कधी तो त्याने गायलेली अंगाईगीत रेकॉर्ड करून मला पाठवतो. सगळ्यांच्या प्रार्थना त्याच्यासोबत असून तो लवकरच पूर्ण बरा होऊन परतणार आहे असेही भारद्वाज यांनी म्हटले आहे”.
 
इरफान सध्या लंडनमधील रुग्णालयात ‘न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर’ या आजारावर उपचार घेत आहे. तो अधून मधून  टि्वट करत असतो.