बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सैफ अली खान बनणार नागा साधू

सैफ अली खानची नवीन वेब सिरीज 'द सॅक्रीड गेम्स' सध्या वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहे. या वेब सिरीजमध्ये सैफ अली आतापर्यंतचा सर्वात भारी रोल साकारणार असल्याचे समजते आहे. जगभरातून त्याच्या या वेब सिरीजबाबत नोटिफिकेशन मिळत आहेत. या वेब सिरीजनंतर तो 'हंटर' नावाचा सिनेमा करणार आहे. त्यात त्याला नागा साधूचा रोल करायचा आहे. याचे शूटिंग राजस्थानमध्ये होते आहे. या रोलसाठी सैफ अली खानला खूपच कष्ट घ्यायला लागले आहेत. कान टोचण्याबरोबर त्याला लांब दाढीही वाढवायला लागली. केसांचा टोप चढवायलाच त्याला 40 मिनिटे  लागायची. या शूटिंगच्या पहिल्या 50 दिवसांच्या शेड्युलनंतर सैफमध्येखूप बदल झाल्याचे सैफच्या स्पॉट बॉयलाही जाणवले. आता हे शूटिंग संपत आले आहे. सैफच्या वाट्याला प्रथमच अशी साधू बैराग्याची भूमिका आली आहे. त्याला स्वतःलाही या रोलसाठी मोठी मानसिक तयारी करावी लागली होती.