रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जुलै 2018 (10:20 IST)

निधी आणि राहुलचे फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतरही हे जोडपं अनेक वेळा एकत्र दिसून आलं होतं. मात्र सध्या त्यांच्या लंडन भेटीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हे दोघं लंडनमध्ये त्यांच्या क्वालिटी टाईम व्यतीत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या टीम इंडियाचे लंडनमध्ये एक दिवसीय सामने सुरु असून निधी अग्रवाल तिच्या आगामी चित्रपटासाठी लंडनमध्ये चित्रीकरण करत आहे. याच दरम्यान, मिळालेल्या फावल्या वेळात लोकेश राहुल आणि निधी यांनी एकमेकांना वेळ देत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकेश राहुल आणि निधी यांचा लंच करतानाचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.
 
काही दिवसापूर्वीदेखील राहुल आणि निधी एकत्र जेवण करताना दिसले होते. यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत राहुलने निधीही बालपणीची मैत्री असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र पुन्हा एकदा हे दोघं लंडनमध्ये लंच करताना एकत्र आढळल्यामुळे त्यांच्याविषयीच्या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, निधीने 'मुन्ना मायकल' या चित्रपटातून बॉलिवूडध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाध्ये तिच्याबरोबर अभिनेता टायगर श्रॉफ देखील झळकला होता.