शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 सप्टेंबर 2018 (09:45 IST)

ओशोंच्या भूमिकेत अभिनेता आमीर खान दिसणार

aamir khan
आता अध्यात्मिक गुरू ओशो यांच्यावर चित्रपट बनत आहे. या चित्रपटात ओशोंच्या भूमिकेत अभिनेता आमीर खान दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तर या बायोपिकमध्ये अभिनेत्री आलिया भटदेखील दिसणार आहे. यात ती माँ आनंद शीला यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
शकुन बत्राने ओशो यांच्या जीवनावर चित्रपट साकारण्याची तयारी दाखवली  आहे. ओशो यांच्या सेक्रेटरी असणाऱ्या माँ आनंद शीला यांच्या भूमिकेसाठी आलियाच्या नावाला पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची स्टारकास्ट आणि ओशोंविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. या सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरूवात होणार आहे.