शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मे 2018 (17:07 IST)

या फोटोमुळे आमीर ट्रोल, अल्लाह ची भीती ठेव

आमिरने स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर मुलगी इरा सोबतचा एक फोटो शेअर केला असून त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहेत. आता या फोटोत असे होते तरी काय? तर आमिर व त्याची मोठी मुलगी इरा दोघेही फन मूडमध्ये आहेत. दोघेही पार्कमध्ये खेळत आहेत. पण सोशल मीडियावरच्या काहींना आमिर व इराचा हा फोटो जराही रूचलेला नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात असा फोटो शेअर करणे गैर असल्याचे त्यांचे मत आहे. अनेक युजर्सने हा फोटो पाहून आमिर व इराबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुलीच्या कपड्यांवर जोरदार टीका केली असून, एकाने ‘कुछ तो खौफ खाओ अल्लाह का़ मैं तुम्हारा सन्मान करता हू. लेकीन यह अस्वीकार है,’असे म्हटले आहे. खरे पाहिले तर या फोटोत गैर काहीच नाही, मात्र आमिरची मुलगी इरा ने जे कपडे घातले आहेत त्यावर काही अतिधार्मिक लोक चिडले आहेत.