बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हिना खान फिशटेल स्टाइल ड्रेसमुळे ट्रोल

'बिग बॉस ११' ची रनरप असलेली हिना खान सध्या खूप चर्चेत असते. आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. तिने शेयर केलेल्या फोटोमुळे ती ट्रोल झालीय .

हिनाने सोशल मीडियावर फोटो शेयर केला. या फोटोमुळे ती सर्वांच्या टीकेची धनी झाली आहे. हिनाने आपल्या इंस्टाग्रामवर फिशटेल स्टाइल ड्रेस घातलेला फोटो शेयर केला. अनेकांनी तिला चांगल्या कमेंट्स दिल्या. पण बऱ्याचजणांनी टीका केली आहे. फॅशन डिझायनर निकिता टंडनने हा ड्रेस तयार केलाय.