मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

उर्वशीला धमकी

हेट स्टोरी 4 ही या सिरीजमधील चौथी फिल्म आहे. यातील एक डायलॉगसाठी उर्वशी रौतेलाला चक्क मारुन टाकण्याची धमकी मिळाली असे समजते आहे. या सिनेमात उर्वशीच्या तोंडी एक डायलॉग आहे. त्यामध्ये द्रौपदीचा संदर्भ आहे. उर्वशीची व्यक्तिरेखा आपली तुलना महाभारतातील द्रौपदीबरोबर करते. द्रौपदी एकावेळी पाच पांडवांबरोबर राहत होती. इथे तर केवळ दोघे आहेत. असे तिने या डायलॉगमध्ये म्हटले आहे. मात्र या डायलॉगमुळे काही व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्या आणि उर्वशीला ठार मारण्याची धमकीच दिली गेली.
 
लोकांच्या या प्रतिक्रियेवर उर्वशी खूप नाराज झाली. अश्या धमक्यांमुळे आपल्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे तिने म्हयले आहे. संजय लीला भन्साळींच्या पद्मावतवर ज्याप्रमाणे लोकांनी जोरदार टीका केली होती. तशीच टीका हेट स्टोरी 4 वर देखील करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कलाकार केवळ स्क्रीप्टमधील डायलॉग वाचत असतात. स्वत: लिहीत नसतात, हे लोकांना समजायला पाहिजे, असेही तिने म्हटले आहे. आपल्याला कोणत्याही धर्माच्या भावना दुखवायच्या नाहीत. आम्ही सर्व धर्मांचा सन्मानच करतो असेही तिने म्हटले आहे.