मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बिकीनीमधील फोटोमुळे राधिका आपटे ट्रोल

सध्या ट्रोलर्सने अभिनेत्री राधिका आपटेवर निशाणा साधला. राधिकाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तो फोटो पाहुन ट्रोलर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली.राधिकाने बीचवरील बिकीनीमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात तिने बिकनी घातली आहे. एका फ्रेंडसोबतचा हा फोटो गोवा बीचवरील आहे. हे इतकंच कारण ट्रेलर्सला ट्रोल करण्यासाठी पुरेसं आहे.
 
यावर राधिकाला विचारले असता ती म्हणाली की, आधी मला माहितच नव्हते की  मी ट्रोल होते आहे. मला कोणीतरी त्याबद्दल सांगितले तेव्हा मला कळले. हे अत्यंत  वाईट आहे. लोकांची काय इच्छा आहे की बीचवर मी साडी नेसू?