मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 मार्च 2018 (08:44 IST)

आमिर खानने दुसऱ्या पोस्टमध्ये मुलाचा फोटो केला शेअर

अभिनेता आमिर खानने आता दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.विशेष म्हणजे, इन्स्टाग्राम हाताळतानाही आमिरचा एक वेगळाच अंदाज दिसून येत आहे. कारण सहसा, नव्याने फोटो पोस्ट करताना जुने पोस्ट कोणी डिलीट करत नाही. पण आमिरने दुसरा फोटो शेअर करण्यापूर्वी पहिला म्हणजेच आईचा फोटो डिलीट केला आहे. नव्याने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये आमिरसोबत त्याचा मुलगा आझाद पाहायला मिळत आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्याने स्वत: बनवलेलं बर्थडे कार्ड देतानाचा हा फोटो आहे. आझाद आणि आमिरचा पाळीव कुत्रा त्याच्या मांडीवर बसले आहेत. मुलासोबतच्या या सुरेख फोटोला आमिरने कॅप्शन दिलं की, ‘माझी दोन मुलं, मला वाढदिवसानिमित्त भेटकार्ड देत आहेत.’