1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (12:07 IST)

शाहरुखच्या सॅल्युटमध्ये करिनाची एन्ट्री

karina kapoor
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश र्शा यांच्या जीवनावरआधारित सॅल्युटचे प्रॉडक्शन गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र शाहरुख खान मुख्य रोल करणार या व्यतिरिक्त त्याबद्दलच्या घडामोडींची कोणतीच चर्चा मीडियामध्ये होत नव्हती. आता मात्र सॅल्युटबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या सिनेमामध्ये कोणीही हिरोईन नसणार असे पूर्वी समजले होते. आता करिना कपूर ही यातील हिरोईन असणार आहे, असे समजते. पण आप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
 
शाहरुख सध्या झिरोच्या कामामध्ये व्यस्त आहे. झिरोच्या कामातून मोकळा झाल्यावर तो सॅल्युटच्या कामाला सुरुवात करणार आहे. जरी भूमीबाबतची बामती खरी असली तरी करिनाने हा सिनेमा सोडल्याचे मात्र अधिकृतपणे समजलेले नाही. त्यामुळे तिचाही रोल सिनेमात असण्याची शक्यता आहे. शाहरुख बरोबरच्या सिनेमामुळे भूमी पेडणेकरला तर अगदी लॉटरीच लागली आहे. आयुष्यमान खुरानाबरोबर 'दम लगाकर हैय्या'मधून पदार्पण केल्यानंतर अक्षय कुमारच्या 'टॉयलेट'मध्ये तिला चांगला ब्रेक मिळाला होता. याशिवाय 'लस्ट स्टोरी'मध्येही ती दिसली होती. करण जोहरच्या मल्टीस्टार तख्तमध्येही ती असणार आहे.