1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. Aishwarya and Shahrukh in the list of influential 100 people

प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत ऐश्वर्या-शाहरूख

Aishwarya
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना जगप्रसिद्ध एशियन जिऑग्रफिक या मासिकाने आशियातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे. या यादीत अनेक भारतीय असून त्यात सेलीब्रिटीज, क्रिकेटर्स आणि उद्योगपतींचा समावेश आहे. मात्र, बॉलिवूडमधील फक्त  शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनाच स्थान देण्यात आले आहे. ऐश्वर्या रायला काही दिवसांपूर्वीच एक्सलेंससाठी मेरिल स्ट्रीप पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. एशियन जिऑग्रफिक या मासिकाने ऐश्वर्या आणि शाहरूख यांना ऐश्टॉनिशिंग एशियंसने सम्मानित करत त्यांचा या यादीत समावेश केला. तसेच या दोन्ही सुपरस्टार्सना मॅगझीनच्या कव्हर पेजवर प्रसिद्धी देण्यात आली. या दोघांशिवाय या यादीत सचिन तेंडुलकर, मुकेश अंबानी, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, उद्योगपती किरण मजूमदार शॉ आणि लेखिका अरुंधती रॉय यांची नावे आहेत. दरम्यान, शाहरूख खान हा डिसेंबरमध्ये झीरो चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिका साकारणार आहेत. दुसरीकडे ऐश्वर्या राय ही अनुराग कश्यप यांच्या गुलाब जामुनमध्ये झळकणार आहे. यात दीर्घ काळानंतर ऐश्वर्या-अभिषेक यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
पुढील लेख
व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही: महात्मा गांधींचे विचार