ऐश्वर्या मेरिल स्ट्रिप एक्सिलन्स अॅवॉर्डने सन्मानित
चित्रपट आणि टी.व्ही.वरील उत्कृष्ट अभिनेत्रींना सन्मानित करण्यासाठी ‘वुमेन इन फिल्म अँड टेलिव्हिजन (डब्ल्यूआयएफटी) इंडिया अॅवॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींची निवड करण्यात येणार आहे. आता भारतीय चित्रपटसृष्टीतून पहिल्या पुरस्कारासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनची निवड करण्यात आली असून, तिला मेरिल स्ट्रिप एक्सिलन्स अॅवॉर्ड देऊन सन्मानित केले जाणार आहे.
ऐश्वर्याला 8 सप्टेंबरला वॉशिंग्टनमधील हयात रीजन्सीमधील सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्काराला हॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री मेरिल स्ट्रिपचे नाव देण्यात आले आहे. अनेक ऑस्कर पुरस्कार पटकावलेल्या आणि चॅरिटीसाठीही सतत पुढे असलेल्या मेरिलला अनेक अभिनेत्री आदर्श मानत असतात. ‘विफ्ट इंडिया’ही ‘विफ्ट इंटरनॅशनल’ची एक शाखा आहे. चित्रपट, टी.व्ही., व्हिडीओ आणि अन्य काही माध्यमांमध्ये उत्कृष्ट काम करणार्या महिलांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा उद्देश आहे. ऐश्वर्याशिवाय या कार्यक्रमात ‘धडक’मधून पदार्पण केलेल्या जान्हवी कपूरलाही सन्मानित करण्यात येईल.