शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (11:08 IST)

अभिनेत्री श्रद्धा कपूरला झाला डेंग्‍यू

अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेंग्‍यू झाला आहे. ती सध्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्‍या आयुष्‍यावर चित्रपट करत आहे. त्‍यासाठी चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून दिग्‍दर्शन अमोल गुप्ते करत आहे. त्‍यामुळे तिने सायनाच्‍या बायोपिकचे शूटिंग काही काळासाठी थांबवले आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, 'श्रद्धाला गेल्‍या काही दिवसांपासून अस्‍वस्‍थ वाटत होते. त्‍यानंतर तब्‍येत बरी नसल्‍याने तिने २७ सप्‍टेंबरला शूटिंग बंद केले होते. दरम्‍यान, चित्रपटातील काही सीन्‍सचे शूट अमोल यांनी सुरू केले आहे. ते सायनाच्‍या बालपणीचे काही प्रसंग चाईल्ड आर्टिस्टसोबत शूट करत आहेत. 
 
सायना नेहवालच्या बायोपिकच्‍या शूटिंगला सप्‍टेंबरमध्‍ये सुरुवात झाली होती. चित्रपटात श्रद्धा कपूर सायनाची व्‍यक्‍तिरेखा साकारत आहे. श्रद्धा या चित्रपटासाठी मेहनत घेताना दिसत आहे. सायनाचं आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवताना कोणतीही उणीव राहू नये, असं श्रद्धाला वाटतं. त्‍यामुळेच ती सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे बॅडमिंटन प्रशिक्षण घेत आहे.