मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (13:43 IST)

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग अभिनेत्री

‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, ‘स्त्री’ श्रध्दा कपूर डिजिटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
 
गेले काही दिवस निक-प्रियंका जोडीची डिजीटल विश्वात एवढी चर्चा होती की, प्रियंकाच गेले कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वत्र दिसत होती. पण ‘स्त्री’ चित्रपटातल्या दमदार परफॉर्मन्समुळे श्रध्दाने प्रियांकालाही लोकप्रियतेत मागे टाकलयं. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. 
 
डिजिटल विश्वात सध्या श्रध्दा आणि प्रियंका चोप्राशिवाय 'सुई-धागा' चित्रपटामुळे अनुष्का शर्मा आणि आपल्या वेबसीरिजमुळे राधिका आपटेचा चाहता वर्ग खूप आहे. तसेच मणिकर्णिका सिनेमामुळे कंगना राणावतसुध्दा लोकप्रिय बनली आहे.
 
स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, 'स्त्री चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे आणि सिनेमाला प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे श्रध्दा कपूरच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झालेली दिसून आली आहे. सिनेमा पहिलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया आणि त्याविषयीच्या होणा-या इन्स्टा पोस्टमुळे श्रध्दा इन्स्टाग्रामवर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेच.