गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (18:26 IST)

‘हाऊसफुल ४ला #MeToo चा फटका

साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण तातडीनं रद्द करण्यात यावं अशी मागणी अक्षयनं ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. अक्षय भूमिका साकारत असलेल्या हाऊसफुल ४ चा दिग्दर्शक साजिद खान आणि याच चित्रपटात काम करणाऱ्या नाना पाटेकर या दोघांवरही लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप आहेत.  
 
अक्षयनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ‘ मी देशाबाहेर होतो. परतल्यानंतर मला काही अस्वस्थ करून टाकणाऱ्या बातम्या ऐकायला मिळाल्या. म्हणूनच मी हाऊसफुल ४च्या निर्मात्यांना चित्रीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे अशा प्रकरणात कडक कारवाई होणं गरजेचं आहे. असं अक्षयनं ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.
 
तर साजिदनं ट्विट करत हाऊसफुल ४ चं दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबावरदेखील दबाव वाढत आहे. मी आता नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुल 4 च्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होत आहे असं साजिदनं ट्विट करत म्हटलं आहे.