testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला

bhau kadam
Last Modified सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (13:40 IST)
माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर अवलंबून असतो, असे म्हंटले जाते. उदाहरणार्थ, आपल्या दैनंदिन जीवनात काही काम चांगल्या पद्धतीने पार पडले की, अमुक व्यक्तीने नशीब काढले असे बोलले जाते, पण जर हेच काम बिघडले तर त्याच्या नशिबाला कोसले जाते. मुळात, आपले नशीब हे आपल्याच हातात असते, आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो, मात्र नाव नशिबाचे पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत, फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘नशीबवान’ असे आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. ‘नशीबवान’ सिनेमाच्या या मोशन पोस्टरवर मराठीचा गुणी कलाकार भाऊ कदम एक स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतो. तसेच, त्याच्या हातात त्याचा साथीदार म्हणजे साफ सफाई करणारा
झाडूसुद्धा तेवढ्याच दिमाखात चमकत असल्याचे पाहायला मिळते.

‘नशीबवान’ सिनेमातील भाऊ कदमच्या व्यक्तिरेखेचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीसणाच्या उत्तरार्धात भाऊने याच व्यक्तिरेखेचा पेहराव धारण करत, मुंबईकरांना परिसर स्वच्छ राखण्याचा संदेशदेखील दिला होता. दिवाळीचा जल्लोष साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी फटाके तर वाजवले जातात, पण त्यातून होणाऱ्या कचऱ्याकडे सहज कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणे गरजेचं असून, याच संदेशपर बांद्रा येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली. यात भाऊने रस्त्यावर उतरून सफाई कर्मचाऱ्यासोबत हातात झाडू घेऊन रस्ता साफ करत, मोलाचा हातभार लावला. दिवाळीच्या उत्तरार्धात म्हणजेच भाऊबिजेच्या मुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेला स्थानिकांनीदेखील उत्तम प्रतिसाद दिला.

उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान' हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांची देखील मुख्य भूमिका आहे. 'नशीबवान' या सिनेमाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात
मराठीतील पहिला रॅपर 'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप सॉंग घेऊन ...

ऐश्वर्या रॉय बच्चन आराध्याला लहान वयातच मिळणार्‍या ...

ऐश्वर्या रॉय बच्चन आराध्याला लहान वयातच मिळणार्‍या अटेन्शनमुळे घाबरत आहेत का?
ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांना बच्चन कुटुंबात सर्वाधिक अटेन्शन ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने परदेशात पहिल्यांदा करवा चौथ ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने परदेशात पहिल्यांदा करवा चौथ साजरा केला, बघा फोटो
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची ...

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी ...

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज ...