testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…

sachin
Last Modified शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (14:49 IST)
सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, कि ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे.
नुकताच 'मी पण सचिन' या सिनेमाचा पोस्टर सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं. या सिनेमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी झळकणार आहे. पोस्टरवर
स्वप्नील जोशी आपल्याला क्रिकेट किट मध्ये म्हणजेच क्रिकेट हेल्मेट घालून दिसत आहे आणि याच पोस्टर वर ( Dont Stop Chasing Your Dream ) आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे थांबवू नका अशी टॅग लाईन सुद्धा दिसून येत आहे.

गणराज असोसिएटसने आतापर्यंत अनेक चित्रपटांची प्रस्तुती आणि निर्मिती केली आहे ज्यामध्ये 'मी पण सचिन' या चित्रपटाचा देखील समावेश होत आहे. विशेष म्हणजे, मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव यात लेखक आणि दिग्दर्शक अश्या दुहेरी भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. पोस्टर मध्ये स्वप्नील जोशी आपल्याला एका दमदार क्रिकेटपटू सारखा दिसून येत आहे. आणि पोस्टरवर असणारी टॅग लाईन सुद्धा प्रेक्षकांची अपेक्षा उंचावणार यात काही वाद नाही. हा सिनेमा भविष्यात सचिन होऊ इच्छिणाऱ्या एका महत्वाकांक्षी क्रिकेटपटूवर आधारित आहे का? असा प्रश्न पडतो. शिवाय स्वप्नील जोशी यात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे देखील गुपित आहे. गणेश गीते व नीता जाधव यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या नववर्षात १ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या भेटीला येत आहे. हा सिनेमा भारतातील क्रिकेटवेड्या तरुणाईंचे भावविश्व मांडणारा ठरेल अशी आशा आहे.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....
पुणे- कोल्हापूर बसमध्ये दोघेजण. पहिला :- हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन ...

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप
अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची हायकोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. चित्रपट निर्माता ...

‘रंग माझा वेगळा’ तून हर्षदा खानविलकर नव्या रुपात दिसणार

‘रंग माझा वेगळा’ तून हर्षदा खानविलकर नव्या रुपात दिसणार
स्टार प्रवाहवर येत्या 30 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून मराठी ...

इको फ्रेंडली दिवाळी कशी करावी...??

इको फ्रेंडली दिवाळी कशी करावी...??
नंतर म्हणा ... माझी आई तुझ्यापेक्षा छान फराळ बनवते.

'रुमी' सहज सापडली !

'रुमी' सहज सापडली !
'गर्ल्स' या चित्रपटाचे बोल्ड असे कॅरेक्टर पोस्टर लाँच झाल्यानंतर पोस्टरमधील 'या' तीन मुली ...