1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:10 IST)

बप्पी लाहिरी यांचे मराठीत पदार्पण

bappi lahari in marathi
सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी ४५ वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’या आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज ऐकायला मिळणार आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’सिनेमातल्या ह्या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. ह्या गाण्याला अमितराजने संगीतबध्द केले आहे तर बप्पीदांसोबत पार्श्वगायिका वैशाली सामंतने हे गाणे गायले आहे.
 
रेकॉर्डिंग झाल्यावर बप्पीदांचा भरभरून आशिर्वाद मिळालेला संगीतकार अमितराज म्हणाला, “माझ्या करिअरमधली यंदाची दिवाळी ही सर्वाधिक आठवणीतली ठरली. ज्यांची गाणी लहानपणापासून ऐकत आलो. अशा मोठ्या संगीतकाराकडून आज मी संगीतबध्द केलेल्या गाण्यावर जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तेव्हा ती दिवाळीतलं सर्वात मोठी भेट असते.”