सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By

मराठी प्रेक्षक रसिक व संगीताचे जाणकार, अद्वैत नेमलेकर यांच्याशी केलेली खास बातचीत

ग्रामीण पार्श्वभूमी असली तरी संगीत टिपिकल नाही असे आव्हान असतानाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळणे हेच खरे यश...नाळ चित्रपटात आपल्या पार्श्वसंगीताचा प्रभाव सोडणारे अद्वैत नेमलेकर यांनी जेव्हा वेबदुनिया मराठीशी संवाद साधला तेव्हा मराठी प्रेक्षकांचे भरभरुन कौतुक केले. 
 
नाळ या चित्रपटाच्या माध्यमाने आपली नव्याने ओळख निर्माण करणारे अद्वैत 150 हून अधिक शार्ट फिल्म्स आणि अनेक जाहिरातींसाठी काम करुन चुकले आहे. चित्रपटासाठी ऑफर मिळाली तेव्हा विषय समजल्यावर लगेच होकार देणार्‍या अद्वैत यांच्याप्रमाणे मोठ्या पडद्यासाठी काम करताना प्रत्येक कलाकाराची भूमिका लक्षात ठेवावी लागते. 
 
आधी ही अनेक मोठ्या कलावंतांसोबत काम करुन चुकलेले अद्वैत सांगतात की चित्रपटात कलाकार मोठे असले तर जरा टेन्शन येतं कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात परंतू नर्व्हसनेस वाटत नाही कारण कलाकार मोठे असले तरी फार सहज आणि मनमिळाऊ असतात. ते आपल्याला अगदी कुटुंबासारखे वागवतात. अशात त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं.
 
संगीताला भाषेची गरज नाही तरी वेगवेगळ्या प्रातांसाठी काम करताना शास्त्रीय संगीतावर अधिक भर असते परंतू नाळ या चित्रपटात ग्रामीण पृष्ठभूमी असली तरी वाद्य यंत्र पाश्चात्य वापरले कारण आम्हाला ते टिपिकल गावासाठी वापरण्यात येणारे वाद्ययंत्र वापरायचे नव्हते. काही वेगळे करु या विचारासोबतच आम्ही पुढे वाढलो कारण गावाची पृष्ठभूमी या पेक्षा सिचुएशन व कॅरेक्टरर्सवर अधिक लक्ष केद्रिंत करायचे असा विचार केला.
अद्वैत यांच्याप्रमाणे चित्रपटासाठी काम करताना अधिक वेळ देण्याची गरज असते. कारण थीम आणि तसेच त्यातील प्रत्येकाची भूमिका लक्षात घेऊन कोणते वाद्य यंत्र वापरायचे हा विचार करायला जरा वेळ द्यावं लागतो. त्या हिशोबाने चाल आणि सूर बसवावे लागतात. तसेच चित्रपटात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेळ मिळतो परंतू जाहिरात आणि शार्ट फिल्म्सच्या अपेक्षा जरा वेगळ्या असतात. त्यात कमी वेळात उत्तम परिणाम देणे हे सगळ्यात मोठे आव्हान असतं. त्यांच्याप्रमाणे चित्रपट कसोटी सामना तर जाहिरातसाठी काम करणे ट्वेंटी-20 सामन्यासाठी खेळण्यासारखे आहे.
 
अनेक भाषांसाठी काम करुन चुकलेले अद्वैत नेमलेकर यांचे मराठीवर अत्यंत प्रेम आहे. त्यांच्या हिशोबाने मराठी प्रेक्षक अत्यंत रसिक व संगीताचे जाणकार असतात. त्यांचे संगीताप्रती प्रेम आणि समज याच कारणामुळे अशा प्रेक्षकांकडून कौतुक होणे म्हणजे पुरस्कार जिंकण्यासारखे आहे. त्यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची ठरते. म्हणून मराठी इंडस्ट्रीसाठी काम करायला मला नेहमीच आवडेल, असे अद्वैतने मनापासून सांगितले.