सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पुणे विद्यापीठाचे नागराज मंजुळेना आदेश

सैराट फेम नागराज मंजुळे यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. त्याचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट सुरवात होण्या आगोदर त्याला झटका बसला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या आगामी हिंदी सिनेमाचा सेट सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानातून आठ दिवसात हटवण्याचे आदेश विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिले आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणार आहे.
 
सिनेमाच्या चित्रिकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीजच्या कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठावर कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नागराज काय मार्ग काढतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहेत.