शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंढे यांनी स्विकारला मनपा आयुक्तपदाचा पदभार

tukaram mundhe
पूर्ण राज्यात गाजलेले,  प्रामाणिक आणि धडाकेबाज असलेलें सनधी अधिकारी   तुकाराम मुंढे यांनी आज बरोबर १० वाजता मनपा आयुक्त पदाचा पदभार स्विकारला आहे. आज ते राजीव गांधी भवन येथे आले, तेव्हा सर्व मनपा कर्मचारी वर्गाची जोरदार धावपळ झाली आहे. यावेळी त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यांनी महापालिका इमारतीची माहिती करवून घेतली, आणि अगदी वेळेवर १० वाजता त्यांनी पदभार स्विकारला आहे. मात्र यावेळी सुद्धा त्यांची नजर अधिकारी वर्गावर होती. त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

नाशिक महापालिका आयुक्तांचा पहिल्याच दिवशी दणका, अधिकारी यांच्या बैठकीत अग्निशमन विभागाचे अधिकारी अनिल महाजन यांना ड्रेस घालून या असे सांगितले अनिल महाजन यांनी बैठकीतून काढता पाय घेतला व घरी जाऊन ड्रेस परिधान करून पुन्हा बैठकीला हजर झाले. त्यामुळे कर्मचारी वर्ग पुरता सावध झाला आहे. भाजपमधील अंतर्गत कलह वाढू लागल्यानेच मुख्यमंत्र्यानी 'मुंढे अस्त्र' वापरल्याचे बोलले जात आहे. आता मुंढे यांच्यासमोर नाशिकची विस्कटलेली घडी बसवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
 
सकाळी बरोबर दहा वाजता तुकाराम मुंढे यांनी महापालिका मुख्यालय असलेले राजीव गांधी भवन गाठले आणि आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंढे यांनी मुख्यालयात प्रवेश करतानाच आसपासच्या दालनांची माहिती घेत ते पुढे गेले. महिला स्वच्छतागृहाचे दरवाजे उघडे दिसल्यानंतर त्यांनी ते बंद करण्याची सूचना केली तर लगतच पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबतही त्यांनी सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता शिस्त मोडाल तर कारवाई होणार आहे.