बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महाराष्ट्राच्या वाघाला मिळणार नवे पाय

प्रथमच एका वाघाला कृत्रिम पाय लावण्यात येणार असून अशा पद्धतीने प्रत्यारोपण होणारी ही जगातीली पहिली वहिली शस्त्रक्रिया ठरणार आहे. त्यासाठीच देशातील अघाडीचे ऑर्थेपेडिक सर्जन आणि महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर एकत्र आले आहेत.
 
साहेबराव असे या 8 वर्षीय वाघाचे नाव आहे. 2012 मध्ये शिकार्‍याच्या पिंजर्‍यात अडकल्याने या वाघाला आपला पाय गमवावा लागला होता. त्यावेळी तो दोन वर्षांचा होता.
 
यापूर्वी कुत्रे आणि हत्ती यांना कृत्रिम पाय लावण्यात आले आहेत. मात्र, वाघांवर अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्याचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे, असे ऑर्थेपेडिक सर्जन डॉ. सुश्रुत बाभुळकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे बाभुळकर यांनी साहेबरावला दत्तक घेतले आहे.
 
त्याला लंगडताना पाहिले तेव्हा फारच वाईट वाटले होते. एक पाय नसल्याने साहेबरावला वेदनादायी आयुष्य जगावे लागत आहे. त्याची या वेदनेतून मुक्तता करण्याठीच कृत्रिम पाय लावण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.