बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:33 IST)

नरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून मृत्यू

बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून अखेर मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहरी  येथील शेतकरी भगवान टेकाम यांच्या ज्वारीच्या शेतात विद्युत प्रवाह लावला होता. त्या प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजं बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीच्या दहशतीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी या वाघिणीला ठार मारण्याचा आदेशमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैध ठरवला होता. हा आदेश वैध ठरला असला तरी, सुरुवातीला वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे प्रयत्न केले जाणार होते. यादरम्यान, वाघिणीने परत माणसांवर हल्ले केल्यास तिला ठार मारण्यात येणार होते.