पंडितजींच्या हृदयातील एक अमुल्य ठेवा होता. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. ''मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे'', याबाबत ते आग्रही असत. 14 नोव्हेंबर हा नेहरुंचा जयंतीदिन खर्या अर्थाने 'बालदिन' म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. पंडित नेहरुंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
संस्कृत पंडित म्हणून ख्याती
नेहरु घराणं हे मुळचं काश्मिरातलं. त्यांच्या पुर्वजांची संस्कृत पंडित म्हणून जनमानसात ख्याती होती, म्हणूनच सारस्वत ब्राह्मण असलेल्या या घराण्याला 'पंडित' म्हणण्याचा प्रघात होता. अलाहाबाद येथील त्यांच आनंदभवन राजेरजवाड्यांनाही मोह पडल इतकं भव्य व आकर्षक होत. मोतीलाल व स्वरुपराणी या समृद्ध व सुखी दांपत्याला 14 नोव्हेंबर 1889 रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे शिक्षण विलायतेत झालं होतं, तरी देखील हिंदुस्थानातून ब्रिटिश राजवटीचा शेवट कसा होईल यांचा त्यांना सदैव ध्यास असे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत बॅरिस्टर पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली. त्यानंतर त्यांनी गांधीजींच्या ब्रिटीश सरकारविरुद्ध पुकारलेल्या असहकार चळवळीत उडी घेतली.
ऑगस्ट क्रांतीचा वणवा
मुंबईच्या गवालिया टँक येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरलं होतं. याप्रसंगी महात्मा गांधी, मौलाना आझाद सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांना चलेजाव चा सज्जड इशारा दिला. यावेळी नेहरु आपल्या भाषणात म्हणाले की, ''या लढ्यात आता माघार नाही. यात आम्ही विजय मिळवून आझाद हिंदुस्थानाच्या भूमीवर उभे राहू, अन्यथा खवळलेल्या महासागरात बुडून जगातून नाहिसे होऊ.'' करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची घोषणा करुन त्यांनी जनमानसाच्या अंत:करणात क्रांतीची प्रखर ज्योत प्रज्वलित केली.
इंदिराजींची उत्तम जडणघडण
प्रत्येक देशातील ज्येष्ठ नेते व तेथील परराष्ट्रीय धोरणाची माहिती व्हावी, यासाठी नेहरु हे इंदिरा गांधींना आपल्यासोबत परदेश दौर्यात नेत असात. त्यामुळे इंदिराजींची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्यांशी ओळख झाली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य लढ्याची तसेच त्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांचा परिचय व्हावा, याकरिता नेहरुनी इंदिराजींना महात्मा गांधीच्या सहवासात ठेवलं. त्यामुळे इंदिराजींच्या मनात क्रांतीची भावना निर्माण होऊन त्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या व त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. पंडितजींनी इंदिराजींची बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जडणघडण उत्तमरित्या केल्याने त्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या. इतकेच नव्हे तर त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्या म्हणून गणल्या गेल्या.
अलिप्तवाटी राष्ट्रगटाची उभारणी
नेहरु हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पराराष्ट्र खातं त्यांनी आपल्याकडेच ठेवलं. अमेरिका व रशिया या दोन महाशक्तिंशी नेहरुंचे मित्रत्त्वाचे संबंध असल्याने एकाशी मैत्री, तर दुसर्याशी शत्रूत्त्व करण्यात त्यांना स्वारस्य नव्हतं. यासाठी त्यांनी अलिप्तवादी धोरण अंगिकारले. देशा-देशांमधील कोणताही वाद-तंटा शांततेने, वाटाघाटीवरुन, सामोपचाराने सोडविण्याचे कौशल्य पंडितजींच्या अंगी होत. ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान विल्यम चर्चिल यांनी You are the light of asia या शब्दात नेहरुंचा गौरव केला. पंडीतजींच्या आंतरराष्ट्रीय किर्तीची ही पावतीच ठरली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरुंना 1955 साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले.