मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

खुनीने मंत्रालयावरून उडी मारत केली आत्महत्या

पुन्हा एका धक्कादायक घटना घडली आहे. अयम्ध्ये  मंत्रालयाच्या इमारतीवरून खाली उडी घेत हर्षल रावते हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात त्याला नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या महिन्यात मंत्रालयात झालेली ही तिसरी आत्महत्या आहे.

ही घटना समोर येताच  पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णवाहिकेतून हॉस्पीटलमध्ये  नेले होते.  ही घटना समजल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, जयंत पाटील घटनास्थळी दाखल झाले. धर्मा पाटील प्रकरणानंतरही सरकारला जाग आलेली नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलंय. हर्षलनं आत्महत्या केल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे  मेहुणीच्या खून प्रकरणी हर्षलला शिक्षा झाली होती.

पैठणच्या तुरुंगात तो चार-पाच वर्षांपासून शिक्षा भोगत होता. सध्या तो पॅरोलवर बाहेर होता. परंतु, हर्षलची तुरुंगातील वर्तवणूक चांगली होती, अशीही माहिती हाती येत आहे. त्यामुळे आता पूर्ण तपासणी झाल्यावर सत्या बाहेर येणार आहे.