शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (16:19 IST)

मंत्र्यालयाच्या गार्डन गेटसमोर एका विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

धक्कादायक प्रकार घडला आहे. आज राज्याच्या मंत्र्यालयाच्या गार्डन गेटसमोर एका विद्यार्थ्यानं स्वत:वर रॉकेल ओतून घेतले होते. त्यात त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.  या मुलाने आरोप केला आहे की  एमपीएससी परीक्षेचे पेपर तपासण्यात घोळ झाला आहे.  पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या मुलाचे नाव अविनाश शेट असे आहे. तो  नगर येथील राहणारा असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी दरम्यान त्याने एमपीएससी परीक्षेच्या पेपर तपासणीवर आपला आरोप केला आहे.  त्याने तीन वेळा एमपीएससी परीक्षा दिली, मात्र पास झाला नाही. परीक्षा चांगली जाऊनही पास होत नाही, म्हणजे पेपर तपासणीत काही घोळ आहे असे त्याने जाहीर आरोप केले आहेत.  पुढील तपास सुरू आहे. या आगोदर सुद्धा अनेकदा स्पर्धा परीक्षेवर अनेकदा आरोप झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी एम पी एस सी विरोधात राज्यात विद्यार्थी वर्गाने मोठे आंदोलन केले होते. ते त्यातील भ्रष्टाचार रोखावा अशी मागणी केली आहे.