शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (17:26 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेस बंद राहणार हे आहे वेळापत्रक

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरून प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्यापासून  म्हणजे दि. 6 ते 14 मार्चपर्यंत एक्सप्रेसवेवरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे. यामध्ये या हायवे वरील दरड प्रवण क्षेत्रातील दगड हटवण्यासाठी 6 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागामार्फत काम करण्यात येणार आहे. भातण बोगदा, आडोशी बोगदा व अमृतांजन बोगडा परिसरातील दगड काढण्यात येणार आहेत. या दरम्यान सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत द्रुतगती महामार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूकबंद ठेवण्यात येणरा आहे. वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. पुढील वेळापत्रक लिहून ठेवा नाहीतर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.