बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (15:37 IST)

मुख्यमंत्र्यांच्या घरा शेजारी हुक्कापार्लर, पोलिसांचा छापा

नागपूर येथे धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर रविवार मध्य रात्री धाड टाकली आहे. विशेष म्हणजे  या रुफ टॉप हॉटेलला कोणतीही परवानगी नाही. याठिकाणी सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होते. त्यामुळे पोलिसांनवर शंका निर्माण झाली आहे. अनेक तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आले होते. या हॉटेलचं नाव ‘रुफ नाईन’ असं आहे.  हे  हॉटेल धरमपेठ भागात असून   हा परिसर अतिशय व्हीव्हीआयपी मानला जातो.  महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच अनधिकृतपणे हॉटेल कुणाच्या आशीर्वादानं उभं राहिलं? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.  या हॉटेलमधील एक पुरुष कर्मचारी आणि दोन महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.