सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (15:25 IST)

शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे चर्चेत आली ही अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये बादशाह म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेता शाहरुख खान याने “राज’ असो किंवा “राहुल’ प्रत्येक भूमिकेतून तरुणींना वेड लावले आहे. बॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्याची संधी शोधत असते. मात्र अभिनेत्री स्वरा भास्करने शाहरुखसोबत काम करण्यास चक्क नकार दिल्याचे समोर आले आहे.
 
स्वराने “रांझणा’, “प्रेम रतन धन पायो’, “वीरे दी वेडिंग’ यासारख्या चित्रपटातून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. रोखठोक वक्तव्य आणि अभिनयासाठी ती ओळखली जाते. त्यामुळे ती चाहत्यांमध्ये सतत चर्चेचा विषय ठरत असते. यावेळी तिने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे चर्चेत आली आहे.
 
शाहरुखच्या एका नावाजलेल्या चित्रपटासाठी स्वराला विचारणा करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये स्वराला शाहरुखच्या बहिणीची भूमिका साकारायची होती. मात्र बहिणीची भूमिका मिळणार असल्याचे ऐकताच स्वराने स्पष्ट शब्दात नकार दिला.
माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी शाहरुख एक आहे. त्यामुळे जर त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली तर मला प्रमुख भूमिका किंवा त्याची अभिनेत्री व्हायला आवडेल. त्याची बहीण होण्याचा विचार मी कधी स्वप्नातही करु शकत नाही. त्यामुळे या चित्रपटात मी बहिणीची भूमिका साकारु शकणार नाही, असे म्हणत स्वराने या चित्रपट झळकण्यास नकार दिला.