शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (14:41 IST)

अगं सगळं करून झालेय आमचं.

अगं सगळं करून झालेय आमचं....
आठवतंय मला, मी बाविशीत असताना 
ऑफिस मधल्या सर्व सिनियर लेडीज ची धावपळ पाहताना, 
वाटायचे कसे उठतात ह्या एवढ्या पहाटे मी तर मस्त राहते साखर झोपेत  ....
तेव्हा चाळीशीत असणाऱ्या गीता मॅडम आणि कांचन मॅडम म्हणायच्या अगं तुझे दिवस आहेत झोपायचे कशाला घेतेस टेन्शन आत्ताच लवकर उठायचे..... 
एक दिवस असा येईल,  वाटेल तुला झोपावेसे आणि साधे पडायलाही मिळणार नाही, झोपून घे आत्ताच म्हणजे नंतर वाईट वाटणार नाही. 
मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या 
अगं सगळं करून झालेय आमचं.........
 
आठवतंय मला, मी पंचविशीत असताना,
पदरी काही महिण्याची पहिली मुलगी असताना ऑफिस ला जाताना होणारी माझी ती धावपळ
सकाळ सकाळ सर्वांसाठी पोळी भाजी करून नवऱ्याचा आणि स्वतःचा टिफिन भरून ट्रेन साठी धावताना.....
आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशा चाळीशीत असणाऱ्या सुलोचना मॅडम ला सुंदर साडी नेसून आलेल्या पाहताना
वाटायचे आम्हाला वेळ नाही आरशात हि पाहायला  आणि मॅडम किती छान छान मॅचिंग करून आलेल्या
मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या 
अगं सगळं करून झालेय आमचं.........
 
आठवतंय मला, मी अट्ठाविशीत असताना, 
सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना होणारी ती चीड चीड कि मी च का????
असं विचार करत असताना ...........
आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशा चाळीशीत असणाऱ्या प्रज्ञा मॅडम आणि त्यांच्या वयाने जर मोठ्या असणाऱ्या मैत्रिणी सुधा आणि सुरेखा मॅडम शांतपणे माझ्याकडे पाहून हसणाऱ्या मी म्हणायची तुम्ही इतके शांत कसे बसू शकता मी नाही सहन करू शकत , त्या म्हणायच्या अगं तू अजून लहान आहेस आमच्या एवढी झालीस कि तू सुद्धा शांत होशील.....
मी म्हणायचे मी नाही शांत होणार,माझी चीड चीड खरी आहे,उगाचच सहन का करत राहायचे, गप्प का बसायचे...... 
मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या 
अगं सगळं करून झालेय आमचं.........
 
आठवतंय मला,  मी तिशीत असताना 
जेवणाच्या डब्या बरोबर आता मुलीच्या स्कुल ची हि जबादारी वाढली होती
प्ले ग्रुप ला जाताना तिची अंधोळ पांघोळ घालून स्कूल बस च्या मागे धावताना होणारी ती माझी धावपळ......
आणि दुसऱ्या बाजूला ४५ मध्ये असणाऱ्या हेमा, रजनी आणि सुरेखा मॅडमची छान साडी बघून
आणि डब्याला काही स्पेशल बनवून आणताना, मला वाटायचे तुम्हाला काय तुमची मुले जातात
कॉलेज ला 
मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या 
अगं सगळं करून झालेय आमचं..........
 
आठवतंय मला,  मी तेहतीशीत असताना, 
पदरी अजून एक लहान मूल असताना, रात्र भर तिच्यासाठी जागून हि पुन्हा सकाळी लवकर उठून जेवणाची तयारी करून मोठ्या मुलीचे सगळे आवरून आरशात हि न पाहता मग स्वतःची तयारी करून ट्रेन साठी धावताना होणारी ती माझी धावपळ 
आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशा ४५ शीत असणाऱ्या सायली मॅडम ला सुंदर सुंदर कॉटन चे एक्सपेन्सिव्ह ड्रेस घातलेले पाहताना आणि भावना मॅडम ला मॅचिंग टिकली आणि मॅचिंग लिपस्टिक लावताना आणि सुंदर सुंदर कानातले गळ्यातले  घालून आलेले पाहताना 
वाटायचे आम्हाला आरशात हि पाहायला वेळ नाही आणि मॅडम किती आणि कसे छान छान मॅचिंग करून आलेल्या 
मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या म्हणायच्या 
अगं सगळं करून झालेय आमचं.........
 
आठवतंय मला,  मी पस्तिशीत असताना 
दोन लहान मुली, त्यांची शाळा आणि ऑफिस चा डब्बा एक एक जबादारी कमी नाही पण वाढतच चालली होती आणि धावपळ काही थांबत न्हवती आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशा पन्नाशीत असणाऱ्या स्वाती मॅडम ला सारखी सारखी लिपस्टिक लावताना आणि सकाळ सकाळ जॉगिंग आणि योगा करून ऑफिस ला टका टक आलेले पाहताना  एवढे च नाही तर मिताली मॅडम च्या केसातला छान सा गजरा पाहताना, संध्या मॅडमच्या साडी आणि ब्लॉउज ची मस्त डिझाईन पाहतांना कौतुक करावेसे वाटायचे आणि मी म्हणायची कसे जमते तुम्हा सर्वाना सगळे काही करून स्वतः ला इतके सुंदर ठेवताना आणि चेहऱ्यावर कायम आनंद निर्माण करताना, हळूच वाटायचे बऱ्याचजणींकडे बाई आहे कामाला,  
इथे चपात्या लागतात आम्हाला  लाटायला
मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या
अगं सगळं करून झालेय आमचं.........
 
जरी ऑफीस मध्ये या सर्व अधिकारी वर्गात असल्या तरी घरच्या जाबदार्यांना कधी कोणी मुकल्या न्हवत्या, मुलांची काळजी आणि त्यांचा अभ्यास हाही कोणाला चुकला न्हवता.
जेवणाची जबादारी म्हणजे जणू स्त्री जन्माला पाचवीलाच पुजल्या होत्या, 
पण त्यातून आपली स्वतःची हि प्रगती करताना छाया आणि ऋचा मॅडम किती काय काय शिकवायच्या आणि हळूच महत्वाच्या टिप्स पण मला द्यायच्या. मी म्हणायचे कसे काय जमते तुम्हाला????? मला तर घर आणि ऑफिस यापलीकडे आपले काही अस्तित्व आहे हेच समजत नाही. 
शशी मॅडम काय, कल्पना मॅडम काय आणि माझी सर्विस करणारी आई काय या सर्वांचे एकच वाक्य 
अगं सगळं करून झालेय आमचं .........
 
आता मी स्वतः चाळीशी क्रॉस केली आहे, माझ्या मुली हाय स्कूल मध्ये गेल्या आहेत, घरात स्वयंपाक बनवायला बाई आहे. आता, मलाही थोडा सा वेळ मिळतोय आरश्यात पाहायला आणि थोडी फार लिपस्टिक लावायला.
ऑफिस मधल्या २५, ३० शी त ल्या मुली हळूच मला विचारतात किती छान मेन्टेन करता मॅडम तुम्ही कसे जमते तुम्हाला.....
तिशीत असणाऱ्या हर्षु ची होणारी ती धावपळ, मुलीसाठी होणारी तिची ती तगमग आणि मग तीही हळूच  विचारते मला काय मॅडम तुम्ही खूप धन्य आहात सगळे काही जिथल्या तिथे कसे जमते तुम्हाला!!!!!!!
मग, आता मी पण हळूच स्मित हास्य देऊन म्हणते 
अगं सगळं करून झालेय आमचं.........
 
पण यावर मी थांबत नाही, मी सांगते हर्षुला........
तू नको चाळीशी ची वाट पाहूस 
आत्ताच ठेव एक बाई सकाळच्या मदतीला आणि शिकून घे काम विभागून करायला 
कर्तव्याला कधी मागे हटू नकोस आणि स्वतःहून जबादारी घ्यायला कधी घाबरू नकोस, सगळ्या गोष्टीतून सामोरे जायला निसर्गाने च शक्ती दिली आहे स्त्रीला.
केस काळे असताना आणि कोमल त्वचा असताना शिक आरशात पाहायला स्वतःला
नाही तर काळे केस कधी पांढरे झाले, कळणार हि नाही तुम्हाला 
तू तरी चाळीशी झाल्यावर म्हणू नकोस नव्या पिढीला कि  
अगं सगळं करून झालेय आमचं....
मी हेही सांगेन तुला कि कुठेतरी सुरुवात केली पाहिजे बदलायला...........
कुठेतरी सुरुवात केली पाहिजे बदलायला...........कुठेतरी सुरुवात केली पाहिजे बदलायला...........