सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (13:47 IST)

मुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित

शाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. अशात जर त्याने आपल्या कुटुंबीयांसाठी काही म्हटले तर लोकांना आश्चर्य होईल. गोष्ट अशी आहे की एका विधानात शाहरुखने त्याची लाडकी मुलगी सुहाना खानला सावळी म्हटले आहे. त्यानंतर लोकांनी त्याला जज करणे सुरू केले.   
 
ही गोष्ट तेव्हा घडली जेव्हा शाहरुख खान कोलकाता फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी गेला होता. इवेंटनंतर मीडियाने त्याच्याशी प्रश्न विचारण्यास सुरू केले ज्यात एक प्रश्न त्याच्या फेअरनेस क्रीमच्या जाहितरातीबद्दल होता. त्यावर शाहरुख म्हणाला माझी मुलगी देखील सावळी आहे आणि ती जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे.  
 
शाहरुख म्हणाला मी कधीही स्वत:ला सुंदर मानले नाही. ना तर मी उंच आहे आणि माझी बॉडी देखील एवढी चांगली नाही आहे आणि मला चांगला डांस ही करता येत नाही. मला या स्टारडमने असे बनवले आहे ज्यामुळे मी पोस्टर्सवर बनून राहतो.  
 
शाहरुख पुढे म्हणाला की याच प्रकारे माझी बायको आणि मुलं देखील सामान्य लोकांप्रमाणे आहे. आम्ही लोअर मिडिल क्लास फॅमिलीहून येतो. मी  पूर्ण प्रामाणिकपणे ने सांगतो की माझी मुलगी सावळी आहे पण ती जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे. त्याच्या या विधानामुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. 
 
त्याच्या या विधानाला या प्रकारे घेण्यात आले की 'मेरी बेटी बहुत सांवली है लेकिन....'। जेव्हाकी विधानात त्याने 'लेकिन' च्या जागेवर 'और' शब्दाचा वापर केला होता. अशात सुहाना एकदा परत चर्चेत आहे आणि शाहरुखच्या चाहत्यांना हे माहीत आहे की त्याचे हे विधान आपल्या प्रिय फॅमिलीला खाली दाखवायचे नसून लोकांना वास्तविकता सांगायची मात्र होती.