मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (11:15 IST)

प्रियांका-निकच्या लग्नाला मोदी राहाणार उपस्थित?

Priyanka
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्राची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्र असल्याने ती परदेशी सून होणार आहे. नुकताच निक भारतात आला असून 30 नोव्हेंबर रोजी या दोघांचे राजस्थानधील जोधपूर येथे लग्र होणार आहे. या विवाहसोहळ्याला कोण कोण उपस्थित राहाणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. निक जोनास नुकताच दिल्लीमध्ये होता. त्यावेळी निक आणि प्रियांका यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना लग्राचे आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, या लग्रसोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या व्यस्त कामांमधून या लग्राला उपस्थित राहाणार का हा प्रश्र्न आहे. प्रियांका आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध अतिशय चांगले असल्याचे आपण याआधीही पाहिले होते. परदेशातील त्यांच्या एका दौर्‍यादरम्यान प्रियांकाने त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही या दोघांचे असणारे चांगले संबंध समोर आले होते. दरम्यान, 2017 पासून निक आणि प्रियांका एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुंबईत त्यांचा साखरपुडा पार पडला. मध्यंतरी निक आणि प्रियांकानं राजस्थानला भेट दिली होती. त्यानंतर इथल्याच राजमहालात विवाह करण्याचं दोघांनीही निश्चित केलं. जोधपूरमधल्या उमेद भवन राजवाड्यामध्ये प्रियांका आणि निक लग्र करणार आहेत. भारतीय पद्धतीनं मेंदी, संगीत, हळद असे विधी होणार आहेत. त्याचबरोबर ख्रिश्चनपद्धतीनंही विवाहसोहळा होणार आहे.