मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (08:31 IST)

दीपिका रणवीर यांचा लग्नसोहळा संपन्न, फोटोची उत्सुकता कायम

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा कोंकणी पद्धतीने लग्नसोहळा संपन्न झाला आहे. पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आल्याने अद्याप इटलीतील या विवाह सोहळ्याचा एकही फोटो अद्याप बाहेर आलेला नाही. लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट पाहुण्यांपुढे ठेवण्यात आली आहे. अन्य कुणाच्याही हाती लग्नाचा एकही फोटो पडणार नाही, यासाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे.
 
काही खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर स्वत: आपल्या या अतिशय खास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करू इच्छितात. प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेला आणि स्वत: निवडलेलाचं फोटो सोशल मीडियावर टाकला जाईल, यासाठी त्यांनी इतका कडेकोट बंदोबस्त केला आहे. आपल्याशिवाय अन्य कुणीही आपल्या लग्नाचा फोटो शेअर करू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे.