मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (17:30 IST)

रणवीर दीपिका लग्न सोहळा : जेवणाचा खास मेनू, मोबाइल वापरावरही बंदी, विमा संरक्षण बरेच काही

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनेही लग्नासाठी बरीच तयारी केली आहे.विशेष म्हणजे, रणवीर- दीपिकाने लग्नातील जेवणासाठी शेफसोबत खास करार केला आहे. या करारानुसार लग्नात बनवण्यात येणारे पदार्थ पुन्हा कुठेच बनवण्यात येणार नाही.  
 
१४ आणि १५ नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दीपिका- रणवीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार असून त्यासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. लग्नसोहळ्यात मोबाइल वापरावरही बंदी आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.विशेष म्हणजे दीपिका आणि रणवीर यांनी लग्नसोहळ्याचा विमाही उतरवला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर यांनी एका विमा कंपनीकडून ‘ऑल रिस्क पॉलिसी’ ही विमा पॉलिसी विकत घेतली आहे. यात १२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत होणारे सर्व कार्यक्रम आणि विधींना विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे. विमानप्रवास, भूकंप, चोरी, पूर,वादळ, आग यामुळं लग्नात अडथळा आल्यास या विम्याचं संरक्षण मिळणार आहे. तसंच या लग्नसोहळ्यात वापरल्या जाणाऱ्या दागिण्यांचा विमा देखील काढण्यात आला आहे.
 
इटलीत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपिका वीर लगेचच मुंबईत परतणार आहे. जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. २८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण देण्यात आलं आहे.