मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (14:17 IST)

'देसी गर्ल'च्या लग्नाच्या फोटोची किंमत सुमारे २५ लाख डॉलर

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या विवाह सोहळ्याविषयीची काही माहिती दर दिवसाआड समोर येत असून, अनेकांनाच थक्क करत आहे. आता प्रियांका आणि निकच्या लग्नातील फोटो हे एका आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये छापण्यात येणार आहेत. ज्यासाठी जवळपास २५ लाख डॉलर इतकी घसघशीत रक्कम 'देसी गर्ल' आणि निकला मिळणार आहे. 
 
अद्यापही याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 'त्या' मासिकाचं नावही गुलदस्त्यातच आहे. पण, फोटो ज्या किमतीला विकले जाणार आहेत तो आकडा पाहून मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.