बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (11:23 IST)

इशा अंबानीच्या लग्नाची तारीख ठरली वाचा ही तारीख

‘रिलायन्स’चे प्रमुख, उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा आणि पिरामल ग्रुपचे अजय पिरामल यांचा मुलगा आनंद यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला असून,येत्या 12 डिसेंबरला मुंबईत ईशा आणि आनंद यांचा शाही विवाह खास निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. दोघांच्याही लग्नाची जोरदार तयारी सुरू असून पत्रिकाही छापून झाल्या आहेत. अंबानी कुटुंबाने पहिली लग्नपत्रिका बाप्पाच्या चरणी अर्पण केली. देशातील अंबानी आणि पिरामल हे सर्वात मोठे उद्योग समूह आहेत. त्यांच्या एकत्र येण्याने व्यवसायातील अनेक गणिते बदलणार असून अंबानी देशातील सर्वात मोठे व्यवसायीक होण्यास मदत होणार आहे. तर पिरामल देखील याची मदत होणार आहे. सध्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हुणुन अंबानी यांची ओळख असून ते जगाच्या श्रीमंत लोकांच्या यादीत सुद्धा आहे. ईशा ही जियोचे सुद्धा काम पाहते.