रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (16:15 IST)

मुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा

जगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या  मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ईशा अंबानी हिचा साखरपुडा उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल याच्यासोबत शुक्रवारी (21 सप्टेंबर) इटलीमध्ये आयोजित करण्यात आलाय. हा ग्रॅन्ड सोहळा तीन दिवस चालणार आहे.
 
साखरपुड्याचा सोहळा इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डीमध्ये पार पडेल. अंबानी कुटुंबासाठी हा क्षण खुपच खास असेल. या सोहळ्यात लंच - डिनरसहीत डान्स इव्हेंटचाही समावेश आहे. 
 
शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता लेक कोमोच्या बेलबियानो विला (Vill Balbiano) मध्ये निमंत्रितांसाठी खास डिनरचं आयोजन करण्यात आलंय. पार्टीत ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत आयोजनाला खास नावं दिली गेलीत. वेलकम लंचला 'Benvenuti A Como' नाव दिलं गेलंय. याचाच अर्थ कोमोमध्ये स्वागत आहे. डिनरला नावं दिलं गेलंय 'Amore E Bellezza' याचा अर्थ आहे 'लव्ह अॅन्ड ब्युटी' असे आहे. 
 
आनंद पीरामल हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ग्रॅज्युएट आहे. सध्या तो पीरामल एन्टरप्राईजचा एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर आहे.