शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (14:57 IST)

प्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो

बॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या लग्राअगोदरच लग्राचे फोटो विकले आहेत. त्या फोटोच्या विक्रीतून तिने 18 कोटी 26 लाखाची कमाई केली आहे. प्रियांकाने आपल्या लग्राचे फोटो एका आंतरराष्ट्रीय मासिकाला विकले असून त्यातूनही कोट्यवधींची कमाई केली आहे. 2 डिसेंबर रोजी न्यूयॉर्कधील प्रसिद्ध गायक निक जोनास याच्या सोबत विवाह करत असून त्यांच्या लग्राच्या चर्चेला उधाण आले आहे. निक जोनास प्रियांकाहून दहा वर्षांनी लहान आहे. प्रियांका आणि निकच्या लग्राच्या फोटोचे हक्क ज्या मासिकाने खरेदी केले असून त्यातून त्या मासिकालाही कोट्यवधींचा नफा होईल असे सांगण्यात येते आहे. ज्या मासिकाला हक्क विकल्याने प्रियांकाच्या लग्राचे फोटो इतर माध्यमांना या मासिकाकडून विकत घ्यावे लागणार हे आता जवळ जवळ स्पष्टच झाले आहे. या अगोदर अभिनेत्री सोनम कपूर हिनेही आपल्या लग्राचे फोटो 'व्होग' या आंतरराष्ट्रीय मासिकाला विकले होते. प्रियंका ही जगातील श्रीमंत सेलिब्रेटीत गणली जाते. प्रियांका ही प्रचंड व्यवहारी नायिका म्हणून गणली जाते. तिच्या लग्राचे वेध संपूर्ण चित्रपट जगताला लागले आहेत.