सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

सप्तम भावाच्या आधारावर स्त्रीचे वैवाहिक जीवन कसे राहील

प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेतील सातवा भाव विवाह आणि वैवाहिक जीवनाशी निगडित असतो. या भावाच्या आधारावर जर व्यक्तीच्या   वैवाहिक जीवनाची भविष्यावाणी केली जाऊ शकते. येथे जाणून घेऊ की सप्तम भावाच्या आधारावर एखाद्या स्त्रीचे वैवाहिक जीवन कसे राहतील –
 
मेष – जर पत्रिकेचा सप्तम भाव मेष राशीचा असेल तर तिचा   जोडीदार भूमी, भवन आणि बर्‍याच संपत्तीचा मालक असतो. यांचा वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धिशाली राहत.  
 
वृषभ – ज्यांच्या पत्रिकेच्या सातव्या भावात वृषभ राशी स्थित आहे, त्यांचा नवरा सुंदर आणि गुणवान असतो. वृषभ राशीचा सप्तम भाव असल्याने जोडीदार गोड बोलणारा आणि बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकणार असतो.  
 
मिथुन – जर कोणाच्या पत्रिकेत सप्तम भावात मिथुन राशी असेल तर त्या कन्येचा नवरा दिसायला सामान्य, समजदार आणि उत्तम विचारांचा असून तो चतुर व्यवसायी असतो.  
 
कर्क – ज्या पत्रिकेचा सप्तम भाव कर्क राशीचा असतो, त्यांचा जोडीदार देखणा असतो. यांचा नवरा कुटुंब आणि समाजात मान सन्मान मिळवणारा असतो.  
 
सिंह – जर मुलीच्या पत्रिकेत सातवा भाव सिंह राशीचा असेल तर तिचा नवरा स्वत:ची गोष्ट खरा करणारा पण इमानदार असतो. ईमानदारीमुळे समाजात त्याला प्रतिष्ठा मिळते.   
 
कन्या – ज्या मुलीच्या पत्रिकेत सातव्या भावात कन्या राशी असेल, तिचा नवरा आकर्षक व्यक्तित्व असणारा आणि गुणवान असतो. ह्या मुलींचे जीवन लग्नानंतर अधिक उत्तम ठरतात.  
 
तुला – कोणाच्या पत्रिकेत सप्तम भाव तुला राशीचा असेल तर या भावाचा स्वामी शुक्र आहे. शुक्राच्या प्रभावामुळे यांचा जोडीदार शिक्षित आणि सुंदर असेल आणि प्रत्येक अडचणीच्या वेळेस आपल्या बायकोचा साथ देणारा असेल.     
 
वृश्चिक – ज्या मुलींच्या पत्रिकेत सप्तम भाव वृश्चिक राशीचा असेल त्यांना राशी स्वामी मंगळच्या प्रभावामुळे सुशिक्षित पतीची प्राप्ती होते. यांचा जोडीदार कठिण परिश्रम करणारा असतो.  
 
धनू – ज्या स्त्रीच्या पत्रिकेत सप्तम भाव धनू राशीचा असेल, तर तिचा पती स्वाभिमानी असेल. अशा कन्येचा जोडीदार सामान्य परिवाराचा असतो आणि सामान्य जीवन व्यतीत करतो.  
 
मकर – जर एखाद्या मुलीच्या पत्रिकेचा सातवा भाव मकर राशीचा असेल तर तिचा जोडीदार धार्मिक कार्यांमध्ये आवड ठेवणारा असेल. यांचा विश्वास दिव्य शक्तींमध्ये जास्त असतो.  
 
कुंभ – जर पत्रिकेचा सातवा भाव कुंभ राशीचा असेल तर जोडीदार  आस्थावान आणि सभ्य असतात. अशा मुलींचे वैवाहिक जीवन फारच उत्तम असतात आणि सर्व सुख सुविधांनी भरपूर राहतात.  
 
मीन – पत्रिकेचा सातवा भाव मीन राशी असल्याने स्त्रीचा पती गुणवान आणि धार्मिक असतो. हे लोक आकर्षक व्यक्तित्व असणारे असतात. कार्य क्षेत्रात उंची गाठतात आणि कुटुंबात सन्मान मिळवतात.