गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (08:45 IST)

गंगाजलमुळे दूर होतात घरातील वास्तू दोष

गंगाजल हे जीवनाच्या सुरुवातीपासून तर मरेपर्यंत प्रत्येक कामांमध्ये उपयोगी पडतं. गंगा स्नान केल्याने सर्व पाप दूर होतात तसेच बर्‍याच रोगांपासून मुक्ती देखील मिळते. वास्तू शास्त्रात देखील गंगाजलाचे प्रयोग केल्याने बरेच दोष दूर करण्याबद्दल सांगण्यात आले आहे. तर जाणून घेऊ त्याबद्दल....  
 
घरात नेमाने गंगाजल शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.
मुलांना जर भितीदायक स्वप्न येत असतील तर झोपण्याअगोदर त्यांच्या बिछान्यावर गंगाजल शिंपडावे.
गंगाजलाला घरात ठेवल्याने नेहमी सुख शांती बनून राहते.
महादेवाला गंगाजल अर्पित केल्याने ते प्रसन्न होतात.
घरात जर काही त्रास असेल तर गंगाजलाला पितळ्याच्या बाटलीत भरून उत्तर पूर्व दिशेत ठेवावे.
सकाळी जेव्हा ही घराचा मुख्य दार उघडाल तर तेथे गंगाजल शिंपडावे.