मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: रविवार, 18 नोव्हेंबर 2018 (00:40 IST)

वास्तुनुसार घरात पोहचत नसेल सूर्य प्रकाश तर हे उपाय करा

सूर्यदेव साक्षात दिसणारे देवता आहे. असे म्हटले जाते की सूर्याला प्रसन्न केले तर सर्व ग्रह तसेच प्रसन्न होतात. सूर्याला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहे. तर जाणून घेऊ त्याबद्दल.
 
अशी मान्यता आहे की गणपती, महादेव, विष्णू, दुर्गा आणि सूर्याची पूजा रोज करायला पाहिजे. सूर्याला प्रसन्न केल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यात सुधारणा येते. प्रात: स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पित करायला पाहिजे. ज्या घरात सूर्याचा प्रकाश योग्य प्रकारे येत नाही तेथे सूर्याची तांब्याची प्रतिमा लावायला पाहिजे. घरात जेथे किंमती वस्तू ठेवल्या आहेत, तेथे तांबत्याची सूर्याची प्रतिमा लावल्याने पैशांची कमी येत नाही.
 
मुलांच्या अभ्यासाच्या खोलीच देखील सूर्याची प्रतिमा लावायला पाहिजे. घरात त्या जागेवर सूर्याची प्रतिमा लावायला पाहिजे जेथे कुटुंबातील लोक जास्त वेळ घालवतात.
 
स्वयंपाकघरात तांब्याची सूर्याची प्रतिमा लावल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता येत नाही. घराच्या मंदिरात तांब्याची सूर्याची प्रतिमा लावल्याने घरात सूर्याची कृपा नेहमी बनून राहते.
 
घरातील पूर्व दिशेत सात घोड्यांच्या रथावर सूर्याचा फोटो लावायला पाहिजे.
 
सूर्याला जल अर्पित करण्यासाठी नेहमी तांब्याच्या पात्राचा वापर केला पाहिजे. या पात्राला वेगळेच ठेवायला पाहिजे. लाल वस्त्र धारण करून सूर्याला जल अर्पित करणे चांगले मानले जाते.