सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (11:41 IST)

जर तुम्ही जुळ्यांना जन्म देणार असाल तर हे 7 आहार आहे तुमच्यासाठी बेस्‍ट

जर तुमच्या गर्भात जुळे आहे तर आम्ही तुम्हाला येथे अशा आहाराची यादी देत आहे जे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. या अवस्थेत तुम्हाला काही सुपर फूड्सचे सेवन अवश्य करायला पाहिजे.
 
गर्भवती महिलेला स्वस्थ आहाराचे सेवन करायला पाहिजे कारण तिच्या द्वारे घेण्यात आलेल्या आहारामुळे तिच्या पोटात असणार्‍या बाळाला पोषक तत्त्व मिळतात. मातेचा आहार जेवढा अधिक स्वस्थ असेल बाळही तेवढंच स्वस्थ राहील. त्याशिवाय गर्भावस्थे  दरम्यान पोषक आहार घेतल्याने गर्भावस्थेशी निगडित बर्‍याच समस्या दूर होण्यास मदत मिळते. म्हणून तुम्ही जुळ्या बाळांची आई बनत असाल तर काही असे खाद्य पदार्थ आहे ज्यांना आपल्या आहारात नक्की सामील केले पाहिजे.   
1. नट्स (सुखे मेवे): नट्समध्ये व्हिटॅमिन्स आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स प्रचुर मात्रेत असल्यामुळे तुमच्या पोटात असलेल्या जुळ्यांना भरपूर पोषण मिळत.  
2. दूध: तुम्ही जुळ्या मुलांची आई बनत असाल किंवा एकाच बाळाची, दूध असा पदार्थ आहे ज्याचे सेवन गर्भवती महिलेने अवश्य करायला पाहिजे, कारण दुधात पोषक तत्त्व फार अधिक प्रमाणात असतात.  
3. दही: दहीमध्ये कॅल्शियम प्रचुर मात्रेत असत. जुळ्या मुलांची आई बनणार्‍या महिलेला अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते कारण मुलांचे हाड आणि दातांच्या विकासासाठी अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते.  
4.फिश: जर तुम्ही जुळ्यांना जन्म देणार असाल आणि तुम्हाला फिशची अॅलर्जी नसेल तर अशी फिश ज्यात मरकरीची मात्रा कमी असेल, ते सेवन करू शकता कारण यात व्हिटॅमिन ई प्रचुर मात्रेत असत.  
5. चणा: काबुली चणा किंवा साध्या चण्यात प्रोटीन भरपूर मात्रेत असत. जर तुम्ही जुळ्यांना जन्म देणार असाल तर तुम्हाला चण्याचे सेवन अवश्य करायला पाहिजे ज्याने तुमच्या बाळांच्या स्नायूंचा विकास योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळेल.  
6. अंडी: अंड्यात बरेच पोषक तत्त्व जसे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात यामुळे जुळ्यांची वाढ होण्यास गर्भावस्थेत फार फायदा होतो.  
7. पालक: पालकामध्ये आयरन प्रचुर मात्रेत असत. पालक स्वस्थ रक्त कोशिकांच्या विकासात सहायक असत.