शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (12:54 IST)

स्वयंपाकघरमध्ये ठेवलेल्या ह्या दोन गोष्टी निरोगी राहण्यासाठी उपयोगी

आयुर्वेदिक दृष्टिने मेथीचे तासीर गरम असतात. ते मसाल्यांच्या स्वरूपात आणि औषधे म्हणून वापरले जाते. त्वचेच्या आजारासाठी मोहरीचे तेल अतिशय उपयुक्त आहे. स्वयंपाक करताना मसाल्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. यामुळे मसाल्यांच्या गुणधर्मांची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
* मेथी - मेथीदाण्याचा वापर मसाला आणि औषधी म्हणून वापर केला जातो तसेच त्याच्या पानाचा वापर भाजी तयार करण्यासाठी केला जातो.  आयुर्वेदिक दृष्टिने याची तासीर गरम आहे आणि त्याचा स्वाद कडू असतो. ह्या मसाल्याचा वापर स्वाद वाढवण्यासाठी केला जात नाही. ह्याने शरीरातील विकार दूर होण्यास मदत मिळते. डिलिव्हरीनंतर स्त्रीला मेथी दिली जाते, ज्यामुळे नवजात मुलांसाठी दूध अधिक मिळते. हे स्नायु-तंत्र मजबूत करते.
* मोहरी - संपूर्ण जगामध्ये प्रचलित मोहरीचे झाड तीन फूट उंच असते. याचे एक विविध रूप 'राई' देखील आहे. या वनस्पतीची भाजी भारतात काहीच भागात बनविल्या जातात. ही भाजी चवीला कडू असते. मोहरीच्या तेलाचा वापर स्वयंपाक तयार करताना व औषधांमध्ये उपयोग केला जातो. कारण यामुळे स्नायू वेदना कमी होते. हे संक्रमण रोधी देखील आहे. त्वचा रोगांसाठी मोहरीचे तेल उपयुक्त आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिने मोहरी देखील गरम आहे. हे इतर मसाल्यांच्या बरोबर मिसळून वापरली जाते.