सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 4 नोव्हेंबर 2018 (00:52 IST)

डेंग्यूझाल्यास हे उपाय करा

सध्या डेंग्यूची साथ सर्वत्र सुरू आहे. विशेषकरून साठलेल्या पाण्यात होणार्‍या डासांमुळे डेंग्यू ताप किंवा हाडमोडी ताप होतो. यात विशेष काळजी घ्यावी लागते. हा आजार झाल्यास हे उपाय करा:
 
1 डेंग्यू तापात शक्यतो आराम करावा आणि शरीरात पाण्याची कमी होता कामा नये. वेळोवेळी पाणी पित राहावे.
 
2 डासापासून बचाव अति आवश्यक आहे म्हणून झोपताना मच्छरदाणी लावून झोपावे. दिवसभरही पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.
 
3 घरात किंवा घराच्या जवळपासदेखील पाणी साठू देऊ नये.
 
4 ताप वाढल्यावर पॅरासिटामॉल घेऊन तापावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थित डिस्प्रि‍न किंवा ऍस्पिरिन सारखे औषधे घेऊ नये.
 
5 वॉटर थेरीपीने शरीरातील तापमान नियंत्रण केलं जाऊ शकतं.
अशी घ्या काळजी:
1  कोणत्याही भांड्यात खूप दिवसापर्यंत पाणी साठू देऊ नये. याने डेंग्यूचा धोका वाढतो.
 
2 पाणी नेहमी झाकून ठेवावे, आणि दररोज भांडे स्वच्छ करून पाणी भरावे.
 
3  कूलर वापरत असल्यास दर रोज पाणी बदला.
 
4 डासांपासून बचावासाठी खिडकी आणि दारात नेट लावावी.
 
5 पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.