मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

हे कान कर्करोगाचे लक्षणे आहे, चुकूनसुद्धा दुर्लक्ष करू नका

कर्करोग हा एक असा आजार आहे, जे सतत लोकांमध्ये वाढत आहे. कर्करोग कोणत्याही प्रकारचे असू शकते. पण आज आम्ही कान कर्करोगाबद्दल बोलत आहोत. जरी कान कर्करोगाचे प्रकरण खूप कमी ऐकू येत असतील तरी त्याकडे दुर्लक्ष करणे जड जाऊ शकतं. कान कर्करोग एक ट्यूमर म्हणून, कानाच्या आत किंवा बाहेर दोन्ही जागी होऊ शकतो. या कर्करोगाच्या पेशींना चिकित्सकीय भाषेत श्वामसस सेल कार्सिनोमा म्हणून देखील ओळखले जाते.
 
हा कर्करोग हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो. कोणत्याही प्रकारचे कर्करोग होण्यापूर्वी काही आवश्यक संकेत देतात, जे लोक बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. आज आम्ही कान कर्करोगाच्या काही प्रारंभिक लक्षणांबद्दल आपल्याला सांगू, त्यांना दुर्लक्ष करू नका. अन्यथा त्याच्या परिणाम पूर्ण शरीराला भोगावा लागू शकतो. याचे चिन्ह ओळखण्याने आणि उपचार घेण्याने धोका टाळता येऊ शकतो.
 
कानातून पाणी किंवा रक्त पडणे - कानातून पाण्यासारखे द्रव्य किंवा रक्त निघत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका.
 
कान संक्रमण - कानात वेदना किंवा संक्रमण असेल तर सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही एक गंभीर समस्या असू शकते.
 
कान बंद होणे - बऱ्याच वेळा असे होते की कानात पाणी गेल्यामुळे कान बंद पडतात. पण काही कारणास्तव ऐकू येत नसेल तर काळजी घ्या.
 
कानात खाज - तसे तर, कानात गोठवलेल्या घाणीमुळे कानात खाज होऊ शकते परंतू अती प्रमाणात खाज सुटणे हे लक्षण गंभीर असू शकतात. अशात ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
 
कानात वेदना - तोंड उघडताना कानात तीव्र वेदना होत असल्यास धोका असू शकतो. म्हणून या इशार्‍याकडे दुर्लक्ष करू नका.
 
ऐकू येणे बंद होणे - कानाने पूर्णपणे ऐकू येणे बंद होणे सर्वात गंभीर आहे. अशात बऱ्याचदा कान दुखणे आणि डोकेदुखीची तक्रार असते. या व्यतिरिक्त कान वाजणे, अल्सर, रक्तस्त्राव आणि रक्त प्रवाह यांसारख्या समस्या देखील जाणवतात.
 
कानाचा पडदा फाटणे - जेव्हा हा पडदा खराब होतो तेव्हा पिवळा आणि पांढरा पदार्थ बाहेर येऊ लागतो. कानाचा पडदा फाटण्याचे हे प्रमुख लक्षण आहे. याचे मुख्य कारण वेगवान आवाज, कान मध्ये बाह्य वस्तूंचा उपयोग, इनर ट्रामा इत्यादी.