गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (00:44 IST)

दररोज सकाळी भिजलेले चणे खाण्याचे फायदे

Benefits of eating chane
देशी चणा न्यूट्रिएंट्स बाबत बदामासारख्या महागड्या ड्राय फ्रूट्सपेक्षा अधिक फायदेशीर असतात. भिजलेल्या चण्यात प्रोटीन, फायबर, मिनरल, आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे बर्‍याच आजारांपासून तसेच निरोगी राहण्यास मदत मिळते. तसे, प्रत्येकास चणे खायला पाहिजे पण विशेषकरून पुरुषांनी नक्कीच याचे सेवन केले पाहिजे.  
 
* खाण्याची योग्य पद्धत - मूठभर चणे घेऊन ते आधी स्वच्छ करून घ्यावे. रात्री त्याला भिजत ठेवावे. सकाळी ते चणे चावून चावून खावे. जर आवडत असल्यास चण्याचे पाणी देखील गाळून त्या पाण्याचे सेवन करू शकता.  
 
* दररोज सकाळी भिजलेले चणे खाण्याचे फायदे :-
 
1. शक्ती आणि ऊर्जा - नियमित भिजलेले चणे खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.
 
2. कब्जा पासून बचाव - भरपूर फायबर असल्याने पोट स्वच्छ होतो आणि पचन चांगले होते.
 
3. स्पर्म संख्या वाढते - सकाळी 1 चमचे साखरेसह ते खाण्याने स्पर्म काउंट वाढतो.
 
4. फर्टिलिटी वाढते - दररोज सकाळी मूठभर भिजलेले चणे मधासोबत खाल्ल्याने फर्टिलिटी वाढते.
 
5. मूत्र समस्या - भिजलेले चणे गुळासोबत खाल्ल्याने वारंवार युरीन जाण्याची समस्या दूर होते. पाईल्सचा त्रास देखील कमी होण्यास मदत होतो.  
 
6. निरोगी त्वचा राहते, वजन वाढण्यास मदत मिळेल, सर्दी खोकल्यापासून रक्षण होते, किडनीचा त्रास नाहीसा होतो तसेच हार्ट निरोगी राहत.   
 
11. भिजलेले चणे खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते  
 
12. रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते.