आंबट लिंबू, गुण गोड
* सकाळ- संध्याकाळ एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून पिण्याने लठ्ठपणा कमी होतो.
* लिंबाच्या फोडीत काळं मीठ भरून चोखण्याने मूळव्याधीत होणारं रक्तस्त्राव बंद होतं.
* खोकला किंवा खूप सर्दी झाली असल्यास अर्ध्या लिंबाच्या रसात दोन चमचे मध मिसळून चाटावे.
* लिंबाचे सेवन केल्याने हृदय गती सामान्य राहते.
* एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून, त्यात काळं मीठ टाकून सकाळ- संध्याकाळ दोनदा नियमित एक महिना पिण्याने मूत्रखडा विरघळून जातो.
* लिंबाचे दोन भाग करावे. त्यांना तव्यावर शेकून त्यावर काळं मीठ भुरभुरून चाटण्याने पित्त विकार दूर होतो.
* एका लिंबाच्या रसात तीन चमचे साखर, दोन चमचे पाणी मिसळून हे मिश्रण डोक्यावर लावण्याने कोंडा दूर होतो आणि केस गळणे ही थांबतात.