सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जेवल्यानंतर या 6 वस्तू आहे विषसमान

सर्वात आधी हा नियम लक्षात ठेवा की नेहमी भूकेपेक्षा कमी आहार घ्यावा. भोजन केल्याच्या एका तासापर्यंत काही खाऊ- पिऊ नये. आता बघू अश्या कोणत्या 6 वस्तू आहे ज्या जेवल्यानंतर घेतल्याने विषसमान ठरतात.

पाणी पिणे
भोजन केल्यानंतर पाणी पिणे हानिकारक आहे. पण आवश्यक असल्यास सामान्य किंवा कोमट पाणी प्यावं. गार पाणी तर मुळीच पिऊ नये. कोमट पाणी पिण्याने आरोग्य चांगलं राहतं. तसेच आहार घेतल्यावर किमान एक ते दीड तासानंतर पाणी प्यावे.

धूम्रपान करणे
जेवणानंतर धूम्रपान करू नये. आहार घेतल्यावर एक सिगारेट किमान दहा सिगारेटएवढे नुकसान करते.

फळांचे सेवन करणे
भोजन झाल्यावर फळांचे सेवन करू नये. याने पोटात गॅस निर्माण होते. म्हणून भोजनच्या एका तासापूर्व किंवा भोजनच्या दोन तासानंतर फळांचे सेवन केले जाऊ शकतात.


चहा पिणे
जेवण झाल्यावर चहा पिऊ नये. याने आहारात घेतलेले प्रोटीन कठोर होऊन पचन क्रियेवर परिणाम टाकतात.

झोपणे
आहार घेतल्यानंतर लगेच झोपू नये. लंचनंतर जरा झपकी घेणे योग्य आहे पण रात्रीच्या जेवण्यानंतर 2 ते 3 ‍तासाचा अंतर असावा.

स्नान करणे
भोजन झाल्यावर लगेच अंघोळ करू नये. याने शरीरातील रक्त प्रवाह वाढतो परंतू पोटाजवळचा कमी होतं ज्याने पचन क्रियेवर विपरित प्रभाव पडतो.