मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (15:41 IST)

जळणारे शेत पाहून निराश शेतकऱ्याची विषप्राशन, मोठे संकट

जळून खाक झाला. त्यामुळे उभा पेटता ऊस पाहून सदर शेतकऱ्याने स्वतः विष घेतले. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना ऐन दिवाळीच्या दिवशी घडली असून दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. सुजित रमेश दहेकर (वय 40) असे शेतकऱ्याचे नाव आहे. यात शेतकऱ्याचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी ही घटना घडली. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. मांगलादेवी येथील सुजित रमेश दहेकर यांच्याकडे सात एकर शेती आहे. त्यापैकी चार एकरात ऊस लावला होता. उसाला बारा महिने झाले असून तो काढणीला आला होता. दरम्यान उसाला आग लागली. त्यात चार एकरातील ऊस जळून खाक झाला. यात ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दहेकर यांनी दिली. सदर प्रकरणी तहसीलदार यांना निवेदन देणार असून शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु त्यानंतर त्यांनी घर जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना तातडीने नेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथून यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.