1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (15:37 IST)

सरकार नाही तर आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागेल - अमित देशमुख

amita deshmukh
सरकार मदत करेल तेव्हा करेल मात्र दुष्काळाचा सामना आपल्यालाच करावा लागेल असे मत कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांनी मांडले आहे. सरकारने पळवाटा काढून दुष्काळ जाहीर केला. सरकारने तातडीने सबंध महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करायला हवा होता. सरकार दुष्काळ निवारणासाठी योग्य उपाय योजना करायला तयार नाही, पाण्याअभावी ऊस जळतोय त्या शेतकर्‍यांना अनुदान देण्याचा उपाय सरकारने करावा, परिस्थिती आणखीच बिघडली तर लातुरला पुन्हा रेल्वेने पाणी येणे शक्य नाही. कारण आता लगेचच निवडणुका नाहीत. सरकार काही करीत नाहीत. आता दुष्काळाचा सामना आपल्यालाच करावा लागेल असे अमित देशमुख यांनी  सांगितले आहे. मराठवाड्यातील सध्या पाण्याची स्थिती गगंभीर असून , लातूरला रेल्वेने पाणी द्यावे लागेले होते त्यामुळे येत्या उन्हाळ्यात काय होते हे पहावे लागणार आहे.